मुरबाड,ठाणे : स्वच्छ भारत विशेष अभियान अंतर्गत विवद्यार्थ्यानी केले मुरबाड आगार, पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छ, अभियानात 300 विद्यार्थ्यां बरोबरच नायब तहसीलदार हनुमंत जगताप सहभागी

1071

     मुरबाड,ठाणे :स्वच्छ भारत विशेष अभियान अंतर्गत मुरबाड मधिल  एन. टी. टी. एफ. विद्यालयाच्या वतिने आज रविवार 30 संप्टेंबर रोजी मुरबाड आगारात  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात 300 विद्यार्थ्यां बरोबरच नायब तहसीलदार हनुमंत जगताप सहभागी झाले होते.

         विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छता राहावी या साठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन याची जाण यावी या दृष्टीने आज मुरबाड शहरातील पोलिस ठाणे, ग्रामिण रूग्णालय व मुरबाड एस टी बस स्थानकात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ही स्वच्छता केली. या वेळी रविवारची सुटी असतानाही या स्वच्छता मोहिमेत नायब तहसिलदार  हनुमंत जगताप, बस स्थानकाचे प्रमुख मालचे, रविंद्र झूंझारराव या विद्यालयाचे शिक्षक मल्लिकार्जून निडभूत्ती, जाॅबी पाल व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.
       या विद्यार्थ्यानी  केलेल्या कामाचे कौतुक सर्वत्र होत असुन सुटी असतानाही हातात झाडु घेवुन स्वच्छता मोहीमेत मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यानी  जनतेला चांगला संदेश दिल्याचे नागराकानी सांगितले.
– प्रतिनिधी, जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *