वाडा तालुक्यातील खानिवली विद्यालयात बालक दिन व बिरसा मुंडा जयंती उत्साहात संपन्न

1125
    वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – वाडा तालुक्यातील खानिवली येथील आ.ल.चंदावरकर विद्यालयात १४ नोव्हेंबर रोजी चाचा नेहरू १३० वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांनी चाचा नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले व काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमावेळी बालगीते, बालमनांवर आधारित भाषणे केली.
     याबरोबरच दिनांक १५ नोव्हेंबर रोजी विद्यालयात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती साजरा करण्यात आली,यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. हे अवघ्या पंचवीस वर्षात समाजात उल्लेखनीय कार्य करणारे आदिवासी जन नायक हे केवळ समाजाचे दैवत नसून त्यांनी देशाला इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात क्रांतीची मशाल पेटविणारी विचारधारा दिली आहे.ते आद्यक्रांतिकारक युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे विद्यालयातील सहशिक्षक  गांगुर्डे सुनील यांनी विद्यार्थ्यांना बिरसामुंडा विषयी माहिती देताना सांगितले, अशाप्रकारे प्रेरणादाई कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *