केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी लवकरच चांगले निर्णय – देवेंद्र फडणवीस

358

इंदापूर,पुणे (-प्रतिनिधी, मल्हारी लोखंडे) : केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी लवकरच काही चांगले निर्णय घेतले जातील, अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शेतकर्‍यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योग सुद्धा चालला पाहिजे, या उद्देशातून साखर उद्योगातील अडचणी मांडल्या. साखर उद्योगांना पॅकेज द्यायला हवे, अशी मागणी केली. एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन अशा अनेक मागण्या आम्ही केल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. शेतकर्‍यांना एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली आहे,असेही देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेसमोर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगासमोरील समस्या मांडल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *