शिरूर,पुणे : पक्षाने संधी व पाठबळ दिल्यास आगामी शिरूर लोकसभा निवडणूक लढविणार – डॉ.वर्षा शिवले

1173
            शिरूर,पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी व पाठबळ दिल्यास हि निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचे पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्या व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले. त्या आज सविंदणे ता.शिरूर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यक्रमासाठी आल्या असताना त्या बोलत होत्या.
           एक स्वच्छ प्रतिमा व सामाजिक कार्यातून असलेला डॉ.वर्षा शिवले यांचा जबरदस्त जनसंपर्क व सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची कार्यपद्धती ही देखील सर्वश्रुत आहे. डॉ. वर्षा शिवले वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित पदवीधर महिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ महिला नेत्या म्हणून त्यांची गणना होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,ससून रुग्णालय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांना जी काही महत्वपूर्ण मदत मिळवून देता येईल ती प्रामाणिकपणे मिळवून देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्या करीत आहेत. शिरूर लोकसभेसाठी पक्षाने त्यांना  उमेदवारीची संधी  देऊन पाठबळ दिल्यास प्रतिस्पर्धी उमेदवारास एक आव्हान नक्कीच  ठरू शकते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरूर लोकसभा मतदार संघातून डॉ.वर्षा शिवले यांना संधी देत या लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱयांनी भक्क्म पाठबळ दिल्यास आगामी शिरूर लोकसभा निवडणूक निकालात इतिहास घडू शकतो. अशी चर्चा आतापासूनच  सुरु झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
– प्रा.सुभाष शेटे,(का.संपादक,स.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *