तांदळी,पुणे : शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमालाच्या बंड कुटुंबियांचा शाळेसाठी मदतीचा हात, जि.प. प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी साठी दिली ५ गुंठे जमीन बक्षीसपत्र करून, परिसरातून बंड यांचे होतेय कौतुक

791
             तांदळी,पुणे : ग्रामीण भागातील शिक्षण किती महत्वाचे आहे याची जाणीव आता प्रत्येकाला होऊ लागली आहे. शासनाच्या गाव,वस्ती तेथे शाळा संकल्पनेला त्या त्या गावातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांकडून विविध रूपाने भरगोस योगदान मिळत असल्याने आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळातून शैक्षणिक दर्जा प्रगतीपथावर असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळणा-या प्राथमिक शाळातील विविध अडचणी सोडविण्यात ग्रामस्थ सातत्याने पुढाकार घेत असल्याचे शिरूर तालुक्यातील अनेक प्राथमिक  शाळांना भेटी दिल्यानंतर पाहावयास मिळत आहे.
            शिरूरच्या पूर्व भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक गुणवत्तावान शाळांना भेडसावत असणाऱ्या विविध समस्या,अडचणी ग्रामस्थ प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.नुकताच तांदळीच्या माळवाडी जिल्हापरिषद शाळा इमारतीसाठी अंजनाबाई पोपटराव गदादे या शिक्षणप्रेमी आजींनी आपली ६ गुंठे जमीन बक्षिसपत्र करून दिली. त्यांचा हा आदर्श व प्रेरणा घेत गणेगाव दुमालाच्या जालिंदर,अशोक,राजेंद्र,संजय भाऊसाहेब बंड या बंधूनी बंडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी ५ गुंठे जमिनीचे स्वखुशीने बक्षीसपत्र करून देत शिक्षणकार्यात अमोल हातभार दिला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिति ,पालक व ग्रामस्थांतर्फे बंड कुटुंबियांचे आभार व्यक्त होत आहेत. यावेळी केंद्रप्रमुख घुमरे,मुख्याध्यापक ठानगे, पोपट निम्बाळकर,बन्शी जगताप,सुरेश तात्या कोंडे,बापूतात्या गरुड़, सचिन गरुड़,निलेश कोंडे,विनायक निम्बाळकर,संतोष बापूराव गरुड,गोपीचंद बंड,वैशालिताई संजय बंड व इतर ग्रामस्थ ऊपस्थित होते.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा. समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *