अलिबाग मधील बोडणी ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल ; ग्रामस्थांचा माफिनामा

378

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : कोप्रोली ग्रामपचांयत मधील बोडणी ग्रामस्थांनी काल दि. 22 जुलै रोजी गावात तपासणी करीता गेलेल्या आरोग्य पथकासह, गटविकास अधिकारी, पोलीस तसेच तहसिलदार यांच्याशी वाद घालुन गावातुन माघारी पाठवले होते. त्या विरोध अलिबाग तहसिल कार्यालयाच्या वतीने मंडल अधिकारी जग्गनाथ ठाकूर यांनी फिर्याद दाखल केल्याने मांडवा पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 353, 143, 147, 149, 427, 504, 506 सह साथ रोग अधिनियम व आपत्ती व्यावस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात 32-35  ग्रामस्थ आरोपी करण्यात आले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, मांडवा सागरी पोलीस स्टेशन हे करीत आहे. अलिबाग तालुक्यातील बोडणी ग्रामस्थांनी दि. 22 जुलै रोजी आरोग्य पथकास गावात तपासणी करिता जोरदार विरोध केला होता.त्यामुळेच गावाच्या वेशिवरून प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला. मात्र त्यानंतर लगेचच प्रशासनाने कडक पाऊल उचलुन गावातील करोना बधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह 30-35 जणांवर गुन्हा दाखल केला. प्रशासनाच्या कडक कारवाईनतंर माडंवा सागरी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके याच्यां नेत्रुत्वाखाली पोलीसांनी गावात लाँगंमार्च केला. त्यानंतर बोडणी  ग्रामस्थ नरमले आणि ग्रामस्थांनी लेखी माफिनामा लिहुन देवुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. ग्रामस्थांनी माफीनामा लिहून दिल्या नंतर  शासनाची भुमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *