आयुर्वेदीक उपचार कोरोनवर ठरताहेत प्रभावी

331

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा उपयुक्त आहे. सद्यस्थितीत कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर आयुर्वेदातील उपचार प्रभावी ठरत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक औषधी, तसेच काढा उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे,” असे प्रतिपादन केरळ येथील आयुर्वेदाचार्य डॉ. एस. गोपाकुमार यांनी केले.

भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने आयोजित ‘सद्यस्थितीत आरोग्य व्यवस्थेतील आयुर्वेदाची भूमिका’वर डॉ. गोपाकुमार यांचे व्याख्यान झाले. हणमंतराव गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. हरीश पाटणकर संकल्पित प्राचीन संहिता गुरुकुल आणि स्मृती आयुर्वेदच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन झाले.  तसेच केशायुर्वेदमध्ये उल्लखेनीय कार्य करणाऱ्या वैद्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये वैद्य नीलिमा अमृते यांना केशायुर्वेद गौरव, वैद्य सोनाली कवठेकर यांना केशायुर्वेद भूषण, वैद्य मृणाल पाटील यांना केशायुर्वेद रत्न, तर वैद्य अनुजा मारवार, वैद्य संध्यारागिनी कापत्कर, वैद्य महेश पवार, वैद्य मिताली निओगी, वैद्य गौरव लायन्सवाला यांना केशायुर्वेद मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्य मिलिंद मोरे व वैद्य सुनिल पंजाबी सर्वाधिक सॅम्पल्सच्या मानकरी ठरले.

डॉ. गोपाकुमार म्हणाले, “आयुर्वेदात शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी औषधी, तसेच ध्यानधारणा, प्राणायाम आदी गोष्टी सांगितल्या आहेत. चवनप्राश, काढा यासह विविध रस, वटी दिल्या जात आहेत. कोरोनाचे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचारांनी बरे होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानेही आयुर्वेदिक उपचारांना मान्यता दिली आहे, ही सकारात्मक बाब आहे.”

हणमंतराव गायकवाड म्हणाले, “आज जगभरात आयुर्वेद स्वीकारला जात आहे. जागतिक आरोग्य संघनटनेने कोरोनावर उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांची दखल घेतली आहे. आयुर्वेदात मोठी क्षमता असून, भारतीय वैद्यांनी त्यात संशोधन केल्यास आयुर्वेदाला वेगळी आणि प्रभावी ओळख मिळेल.” वैद्य हरीश पाटणकर यांनी डॉ. गोपाकुमार यांची मुलाखत घेतली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *