रायगड जिल्ह्यात 8 हजार 874 जणांनी केली करोनावर मात – “काळजी करू नका..काळजी घ्या !”

368
अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आत्तापर्यंत जिल्ह्यातील 8 हजार 874 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 452 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्ण संख्या- पनवेल मनपा-1411, पनवेल ग्रामीण-397, उरण-173, खालापूर-393, कर्जत-105, पेण-355, अलिबाग-340, मुरुड-42, माणगाव-73, तळा-1, रोहा-126, सुधागड-9, श्रीवर्धन-28, म्हसळा-66, महाड-161, पोलादपूर-17 अशी एकूण 3 हजार 697 झाली आहे.
       कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-4 हजार 175, पनवेल ग्रामीण-1 हजार 390, उरण-562, खालापूर-369, कर्जत-297, पेण-595, अलिबाग-508, मुरुड-71, माणगाव-177, तळा-20, रोहा-314, सुधागड-10, श्रीवर्धन-92, म्हसळा-100, महाड-150,  पोलादपूर-44 अशी एकूण 8 हजार 874 आहे. आज दिवसभरातही पनवेल मनपा-119, पनवेल ग्रामीण-106, उरण-15, खालापूर-7, कर्जत-5, पेण-32, अलिबाग-57, मुरुड-1,  रोहा-10, सुधागड-1, श्रीवर्धन-4, महाड-11 असे  एकूण 402 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
तर आत्तापर्यंत पनवेल मनपा-150, पनवेल ग्रामीण-41, उरण-22, खालापूर-23, कर्जत-12, पेण-19, अलिबाग-23, मुरुड-9, माणगाव-3, तळा-2, रोहा-11, सुधागाड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-18, पोलादपूर-5 असे एकूण 350 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-157, पनवेल (ग्रा)-39, उरण-26, खालापूर-16, कर्जत-18, पेण-46, अलिबाग-24, मुरुड-1, माणगाव-3, रोहा-29,  श्रीवर्धन-1, म्हसळा-44, महाड-42, पोलादपूर-3 अशा प्रकारे एकूण 452 ने वाढ झाली आहे.आजच्या दिवसात 16 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-9, पनवेल (ग्रामीण)-2, खालापूर-1, अलिबाग-1, रोहा-2, महाड-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.  आत्तापर्यंत जिल्ह्यातून 42 हजार 295 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 387 आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *