कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतचे विभाजन करण्याची मागणी – दोन वर्षापासून सरकारकडे प्रस्ताव पडून 

606
          मुरबाड,ठाणे : ( प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – कल्याण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नावारुपाला आलेल्या म्हारळ ग्रामपंचायत चे विभाजन करून म्हारळ (खुर्द ) व म्हारळ ( बुद्रुक ) असे विभाजन करण्याची मागणी गेल्या दोन वर्षा पासून होत आहे. सरकार दरबारी गेल्या दोन वर्षे पडीत  प्रस्तावाची आगामी 2020 च्या ग्रामपंचायत निवडणूकी पूर्वी पूर्तता करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निशांत पवार यांनी केली आहे
            ग्रामपंचायतच्या विभाजन साठी पहिला अर्ज 23 एप्रिल 2018 रोजी करण्यात आला होता तर 2011च्या जनगणने नुसार या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 31900एवढी आहे 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये वारंवार सरपंच बदलाचा खेळ होत असल्याने राजकीय वादात ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामाना खीळ बसली आहे.  तर मोठया उत्पन्नाची ग्रामपंचायत असल्याने स्वविकास वाढून भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे पवार यांनी सांगितले.
              म्हारळ ग्रामपंचायतच्या स्थापने नंतर 2018 -19 मध्ये म्हारळ (खुर्द )  व म्हारळ (बुद्रुक ) अशी स्वतंत्र महसुली गावे असल्याने ग्रामपंचायत अधिनियम158 चे  कलम 4 प्रमाणे ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.  मात्र सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोण कापणार ? अशी परिस्थिती राजकिय व प्रशासनाची झाल्याने नियमाप्रमाणे विभाजनाची कार्यवाही झाली नसल्याने आपले सरकार पोर्टल वर ही या या विभाजन प्रक्रियेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र कल्याण तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत असल्याने विभाजन झाल्यास विकासाचा मार्ग सुकर होईल त्यामुळे म्हारळ ग्रामपंचायत च्या विभाजनाची मागणी जोर धरू लागली असून ग्रामविकास मंत्रालय या बाबत कधी निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 .या संदर्भात निशांत पवार,प्रकाश कोंगेरे,चंद्रकांत सुर्यराव,सतीश पवार, गणेश शिंदे, संकेत देशमुख, अरूण सासे, चंद्रकांत म्हात्रे आदी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी कल्याण याना तक्रारी अर्ज दाखल केले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *