मुरबाड कोरोनाचा वाढता प्रभाव मात्र उपचारासाठी सुरू केलेल्या सरकारी कोव्हीड सेंटर ऐवजी खाजगी कोव्हीड सेंटर कडे रुग्णांचा ओघ : सरकारी कोव्हीड सेन्टर मध्ये उपचार घ्या आरोग्य विभागाचे आवाहन  

419
             मुरबाड,ठाणे 🙁 प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बरे होण्याचे प्रमाण पहाता तालुक्यातील बधितांना शहरात उपचारासाठी जागा मिळत नसल्याने मुरबाड मध्ये सरकारी व खाजगी असे दोन कोव्हीड सेन्टर 9 जुलै 2020 रोजी सुरू झाले. मात्र सरकारी कोव्हीड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर साठी तज्ञ डॉक्टर ची कमतरता सोडली तर सर्व सुविधा असताना सरकारी कोव्हीड सेंटर एवजी खाजगी कोव्हीड सेन्टर कडे उपचारासाठी रुग्णांचा ओघ वाढला असून आरोग्य विभागाने सरकारी कोव्हीड सेन्टरचा उपयोग करून घ्या असे आवाहन केले आहे
           दररोज शहरातील व तालुक्यातील बाधितांचा आकडा प्रसिद्ध होताच आरोग्य विभाग या बधितांना संपर्क साधते.  मात्र यापैकी ज्या रुग्णांना खाजगी कोव्हीड सेन्टर ला तर ज्यांना सरकारी कोव्हीड सेन्टर मध्ये उपचार घ्यायचे हा बाधितांचा मताचा विषय असल्याने ज्यांना जिथे उपचार घ्यायचे तिथे सोडले जाते असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.  तर शोधलेल्या माहिती नुसार वातावरणातील बदला मुळे थंडीताप , खोकला , सर्दी ही लक्षणे असलेले अनेक रुग्ण हे क्लीनिक अथवा खाजगी रुग्णालयात गेल्यास त्याना सिटीसक्यांन किंवा एक्सरे काढण्यास सांगण्यात येते या तपासणीत काही आढळून आल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले जाते व कोव्हीड ची लक्षण असल्यास सांगितले जाते मात्र सरकारी यंत्राणा याला मान्यता देत नसून जो पर्यत त्याचा स्वाब टेस्ट चा अहवाल प्राप्त होत नाही तो पर्यन्त  तो बाधित असल्याचे सरकार दरबारी नोंद होत नाही. यामुळे अनेक बाधित स्वाब टेस्ट येण्यापूर्वीच खाजगी रुग्णालयात दाखल होत असल्याने सरकारी कोव्हीड सेन्टर ऐवजी खाजगी कोव्हीड कडे बाधित जाताना दिसत आहेत. या मुळे सरकारी यंत्रणा व खाजगी यंत्रणा अशी चढाओढ सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे.
             मुरबाड तालुक्यातील आतापर्यंत बधितांची संख्या 271 वर पोहचली आहे.  तर 80 बधितांवर उपचार सुरू आहे तसेच आता पर्यंत 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे.  1195 नागरिकांचे स्वाब तपासणी करण्यात आली आहे तर 183 बाधित बरे होऊन आले असल्याची माहिती मुरबाड आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.  तर बधितांनी सरकारी कोव्हीड सेन्टरचा फायदा घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग करत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *