अलिबागच्या पीएनपीच्या शाळांची उत्तुंग भरारी – संस्थेचा निकाल ९२.३३ टक्के – इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा निकाल १०० %कु. राजसी सुंकले ९७.४० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम 

371

अलिबाग,रायगड : (प्रतिनिधी,सारिका पाटील) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकालामध्ये पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. पी.एन.पी होली चाईल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी, जीजेएम इंग्लिश मिडीयम स्कूल खालापूर, पी.एन.पी मराठी माध्यम शाळा जांभरुख- कर्जत, माध्यमिक शाळा पळ्स – कर्जत, माध्यमिक शाळा काकळघर – मुरुड, माध्यमिक शाळा वडशेत वावे – श्रीवर्धन या सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमध्ये पी.एन.पी मराठी माध्यमिक शाळा वेश्वी, या शाळेची विद्यार्थिनी कु. राजसी सदाशिव सुंकले हिने ९७. ४० टक्के गुण संपादन करून संस्थेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. उर्वरित शाळेंचे निकाल ९० टक्केच्या वर लागले असून पी.एन.पी. संस्थेचा निकाल ९२. ३३  टक्के लागला आहे.

संस्थेत मराठी माध्यम शाळांमध्ये राजसी सदाशिव सुंकले माध्यमिक शाळा वेश्वी ९७. ४० टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण तर सानिका संदेश पाटील ९५. ६० टक्के मिळवून द्वितीय आणि आर्यन विश्वास राऊत ९२. ६० गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

त्याच प्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पृथा जगदिश तारकर होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वी ९५. ६ टक्के गुण मिळवून इंग्रजी माध्यमांत प्रथम, प्रेरणा संदीप म्हात्रे ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर इशिता जितेंद्र निगडे आणि श्रावणी विजय वराळे ८९. ८ गुण मिळवून तृतीय येण्याचा मान पटकाविला.

संस्थेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांनी राजसी सुंकले, सानिका पाटील आणि आर्यन राऊत यांचा आणि त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, पेढे देऊन यथोचित सन्मान केला यावेळी मराठी माध्यमिक वेश्वी शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर उपस्थित होते.सर्व यशस्वी विद्यार्थांचे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भाई जयंत पाटील, खजिनदार नृपाल जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, प्रशासन अधिकारी अमित देशपांडे यांनी अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *