कोरोनावर मात करून परतलेल्या पोलिसांचे पुष्पवृष्टी करून स्वागत  – अलिबाग पोलीस ठाण्याच्या पायरीला वंदन करून पोलीस पुन्हा कर्तव्यावर रुजु  

421

        अलिबाग,रायगड : (प्रतिनिधी,सारिका पाटील– कोरोना या रोगाचा मुकाबला करताना याची सर्वाधिक लागण पोलीस दलाला झाली.या जीवघेण्या विषाणुशी लढताना आतापर्यंत अनेक पोलिसांना प्राणाची आहुती द्यावी लागली असली तरी अलिबाग पोलिसांनी यावर यशस्वी मात केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पोलीस बांधव हादरून गेले होते. मात्र मा.पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये पोलिसांची दैनंदिन तपासणी सुरू केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव घटला.

पोलिस हवालदार रमेश सोनकर, पोलिस शिपाई राकेश काळे व राजेश ठाकुर  या तीन कोविड योद्ध्यांनी अलिबाग पोलीस ठाण्याच्या पायरीला वंदन करून पुन्हा कोरोना लढयासाठी सज्ज असल्याचा संदेश सहकार्यांना दिला आहे.आपल्याला दुसरा जन्मच प्राप्त झाल्याचा अनुभव या कर्मचाऱ्यांना आला. कोरोनानंतर कर्तव्याची धुरा स्विकारल्याने उपस्थित कर्मचारी भारावुन गेले. अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक  के.डी.कोल्हे यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी गोपनीय कर्मचारी मितेष म्हात्रे व अलिबाग पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *