अलिबाग तहसील कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर, कोविड योद्ध्यांचा सन्मान – जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले रक्तदान, समाजशील न्यूज नेटवर्कच्या अलिबाग प्रतिनिधी सारिका पाटील यांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव 

545
           अलिबाग,रायगड : (प्रतिनिधी,सारिका पाटील) : महसूल दिनाचे औचित्य साधून तसेच नुकतेच  कोविड़ने निधन झालेले रोहा तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते.
        मात्र या शिबिराचे वैशिष्ट थोडेसे आगळेवेगळे होते, ते म्हणजे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. महसूल दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सर्वप्रथम स्वतःच रक्तदान करून जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी “Leaders Speaks With Action”  याचा सर्वांना  प्रत्यय आणून दिला.
       या शिबिरात  ५० लोकांनी रक्तदान केले. १८८ लोकांची antigen test झाली या टेस्ट मधून  ८ जण पॉझिटिव्ह आले. या निमित्ताने कराेना विरुद्धच्या युद्धात उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
           त्याच बरोबर पत्रकारांनी निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये तसेच कोरोना कालावधीमध्ये प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले तसेच लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केल्याबद्दल महसूल प्रशासनाद्वारे पत्रकारांच्या कामाची दखल घेतली. यात समाजशील न्यूज नेटवर्कच्या अलिबाग प्रतिनिधी सारिका पाटील यांचा ही तहसिलदार सचिन सेजाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
           या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,  प्रांताधिकारी शारदा पाेवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, तहसिलदार सचिन शेजाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *