सेवा निवृत्तीचे लाभ देण्याचे आश्वासन देऊन ही अपूर्णच – कोरोना काळात निवृत्त कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

342
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – खाजगी विनाअनुदानित शाळेतील सेवा वरिष्ठ निवड श्रेणी साठी शालेय शिक्षण विभागाप्रमाणे ग्राह्य धरून सेवा निवृत्तीचे लाभ देण्याचे आश्वासन देत याची 30 मार्च पर्यंत पूर्तता होईल असे सांगून कुठलीही कार्यवाही न झाल्याने येत्या 19 एप्रिल 2021 रोजी  कोरोना काळात उपोषण करण्याचा इशारा निवृत्त होऊन लाभ न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन किमान कोशल्य व उद्योजकता विकास मंत्री नवाब मलिक यांना दिले आहे.
           संघटनेच्या वतीने वारंवार भेटी घेऊन 24 फेब्रुवारी 2020 रोजी आझाद मैदानात झालेल्या उपोषणा नंतर 30 मार्च पर्यंत कार्यवाही होईल असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने 15 मार्च 2021 रोजी निकम व उज्जेनकर यांच्या उपस्थितीत संचालक कार्यालयात बैठक पार पडली असता काही कर्मचाऱ्यांची सेवा शालेय शिक्षण विभागाप्रमाणे ग्राह्य धरल्याचे पुरावे देण्यात आले.काही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी चौथ्या, पाचव्या, सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे सातव्या आयोगात धरून निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र निवृत्त होऊन एक – दोन वर्ष झाले तरी पेन्शन व निवृत्तीचे लाभ न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हे अनेक वेळा निदर्शनास आणून ही कानाडोळा होत असल्याने या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात 19 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपती कुंभार यांनी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *