मुरबाड मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साध्या पद्धतीने 130 वी जयंती साजरी

298
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – राज्यात कोरोनाने भयंकर उद्रेक केला असताना सरकार कडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन केले असताना मुरबाड मध्ये अनेकांनी घरीच साध्या पद्धतीने जयंती साजरी केली. तर काही ठिकाणी  कोरोना काळातील नियमावली चे अंमलबजावणी करत, सामाजिक उपक्रम राबवत महामानवाची जयंती साजरी केली. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांनी पुष्पहार वाहून वंदन केले.
           राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती चे औचित्य साधून आधार फाउंडेशन मुरबाड व अखिल मुरबाड प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरबाड पंचायत समितीच्या सभागृहात संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष कोर ,शिक्षक वर्ग नितीन राणे ,गौतम रातांबे, विलास शिंदे यांनी नियोजन करून कोरोना बधितांना रक्त पुरवठा कमी पडु नये यासाठी हा उपक्रम राबविला.  यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित दाखवली त्याच प्रमाणे मुरबाड काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक येथील ब्लड बँकेच्या मदतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती साजरी करत रक्तदान शिबीर आयोजित करून राज्यातील रक्त साठा सुरळीत होण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुरबाड काँग्रेस तालुका अध्यक्ष चेतनसिंग पवार यांनी यावेळी सांगितले.  तर समता सामाजिक फाउंडेशन च्या वतीने फाउंडेशन चे अध्यक्ष शंकर करडे यांनी तालुक्यातील पत्रकारांना कोरोना काळात सतत काम करत असल्याचे सांगत लोकसेवा पुरस्कार 2021 देऊन सन्मानित केले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक पत्रकारानी समाजासाठी आपली लेखणी चालवावी असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान पवार,रमेश हिंदूराव यांनी पत्रकाराना केले.तालुक्यातील अनेक गावांत साध्या पध्दतीने महामानवाची जयंती साजरी करत कोरोना काळात संयम  दाखवून प्रशासन व समाजाला सहकार्य करत कोरोना मुक्ती मिळो अशी याचना करण्यात आली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *