मुरबाड नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कोरोना काळातील सेवेचे कौतुक : कोव्हीड -19 काळात सर्व कर्मचारी कार्यरत

418
   मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – कोव्हीड -19 काळात शासनाने सर्व प्रशासनातील कर्मचारी वर्ग 15 टक्के वर आणला असताना मुरबाड नगरपंचायत मधील ठेकेदारी व कायम स्वरूपात काम करणारे जवळजवळ 100 ते 105 चतुर्थ श्रेणी कामगार काम करताना दिसत आहेत. मुरबाड बाजारपेठेतील बॅरेंगेट लावण्यापासून , सफाई , फवारणी ,नागरिकांना शोशल डिस्टनस साठी सहकार्य करताना कर्मचारी दिसत होते , विद्यत कर्मचारी , पाणीपुरवठा विभाग , चालक या कर्मचाऱ्यांनी कोव्हीड काळात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू न दिल्याने मुरबाड नगरपंचायतच्या चतुर्थ श्रेणी कामगारांचे स्थानिक पातळीवर कौतुक केले जात आहे.
    कोव्हीड -19 मध्ये काम करताना काही कर्मचारी बधितही झाले. मात्र बरे झाल्याबरोबर  त्यांनी पुन्हा आपल्या कामाचा कार्यभार सांभाळला असल्याने मुरबाड नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना मोलाचे सहकार्य केल्याने ते कौतुकास पात्र ठरले आहेत. सर्वत्र कामगार कपात होत असताना मुरबाड नगरपंचायत चतुर्थ श्रेणी कामगार,पोलीस वर्गा सोबत खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले. कोव्हीड -19 काळात काम करण्याऱ्या मुरबाड नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे कोव्हीड योद्धे म्हणून कौतुक होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *