कल्याण पोलिसांना राख्या बांधून म्हारळ गावातील महिलांनी केला रक्षाबंधन सण साजरा  

887
              मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण साजरा करताना  सदैव “ऑन ड्युटी” असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षा बांधनासह इतर कोणताही सण साजरा करता येत नाही. मात्र रविवारी रक्षा बंधन सणाचे औचित्य साधून  म्हारळ येथील महिला भगिनींनी प्रत्यक्ष म्हारळ येथील कल्याण तालूका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे म्हारळ बीट येथे जाऊन सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षा बंधन सण साजरा केला
                यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत, पो.ह .निकेश मांडोळे आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण  साजरा केला. बजरंग राजपूत यांनी देखील ओवाळणी म्हणून ज्या प्रमाणे इतर वेळी कर्तव्य बजावत इतरांचे रक्षण पोलीस प्रशासनातील सर्व पोलीस बांधव करतात व या महा मारीच्या आजारात कुटुंबाचे विचार न करता कर्तव्य बजावतात. त्याच प्रमाणे या पुढेही आपले रक्षण करतील असा विश्वास उपस्थित भगिनींना देत संकट,अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
            आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटूंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांनी कुटूंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी अनेक पोलीस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, तसेच यावर्षी करोना आजारामुळे पोलीसाना नागरिकांच्या रक्षणासाठी दिवस रात्र रस्त्यावर एकही सुट्टी न घेता कर्तव्य बाजवावे लागत आहे. त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा अशी इच्छा म्हारळ गावातील महिला भगिनींनी व्यक्त केली व त्याप्रमाणे म्हारळ बीटच्या सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *