मुरबाड,ठाणे : मुरबाड मध्ये रविवारी राष्ट्रवादी कॉग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा; दिग्गज नेत्यांची लागणार हजेरी

735
           मुरबाड,ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा मुरबाड येथे रविवारी दुपारी येणार आहे. या यात्रेनिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेण्यात येणार असून मुरबाड मध्ये येत्या रविवारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, माजी आमदार गोटीराम पवार, प्रमोद हिंदूराव आदींसह विविध नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
केंद्र व राज्य सरकारचा भ्रष्टाचार, आतापर्यंत झालेले घोटाळे, दुष्काळ निवारणात अपयश, नागरी वस्त्यांमधील नियोजनाचा अभाव आणि पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून सरकारने केलेली लूटमार आदी प्रश्नांवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष गोटीराम पवार यांनी दिली. रायगडहून निघालेली परिवर्तन यात्रा मुरबाडमध्ये रविवारी येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी दुपारी तीन वाजता जाहीर सभा होईल, असे पवार यांनी सांगितले.
             निवडणुकी पुर्वी मुरबाड मध्ये निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेसचे शक्ती प्रदर्शन होणार हे निच्छीत  असले तरी या वेळी आगामी विधानसभा कशी रंगणार याची गणिते पटलावर येतील असा विश्वास राजकिय गोटातुन वर्तवला जात आहे.राष्ट्रवादीतुन भाजपात आलेले विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड चा विकास हा भाजपात आल्यावर झाला असा विश्वास अनेक वेळा मतदाराना दिला.  मात्र माजी आमदार गोटीराम पवार यांच्या वर्चस्वाला धका देणारे  विद्यमान आमदार कथोरे यांच्यावर नक्कीच टिका टिपणी होणार असा विश्वास नागरिकात असल्याने निर्धार परिवर्तन यात्रा निमित्ताने होणाऱ्या सभेला मोठी गर्दी असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *