शिरूर,पुणे :रांजणगांव गणपती येथे महिला सक्षमीकरण शिबिरात अ‍ॅड्.सीमा काशीकर यांचे महिलांसाठीच्या कायद्यांविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न; महिलांची मोठी उपस्थिती

507
          शिरूर,पुणे : शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगांव गणपती येथील आज फंड वस्तीत महिला सक्षमीकरण शिबिरात अ‍ॅड्.सीमा काशीकर यांचे महिलांसाठीच्या कायद्यांविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महिला आर्थिक  विकास महामंडळ” व क्लासिक कंपनीने आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण शिबिरात कायदेविषयक मार्गदर्शन करण्याकरीता शिरूर येथील नामवंत महिला वकील अ‍ॅड्.सीमा प्रमोद काशीकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
        प्रारंभी दिप प्रज्वलन करून व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित  ७०-८० महिलांना अ‍ॅड्.काशीकर यांनी महिलांविषयक कायद्यांची तसेच धनादेश च्या खटल्यांबाबत व ७/१२ व फेरफार बाबत सविस्तर माहिती दिली.तसेच बॅकांमधील व्यवहारांचे पण महिलांनी अद्ययावत ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.”बेटी बचाओ बेटी पढाओ” ही संकल्पना देखील प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच महिलांनी  स्वतः सर्व प्रकारे सक्षम व्हा असे आवाहन अ‍ॅड्.काशीकर यांनी केले.
         यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या-शुभांगी मैड, व्यवस्थापक-समीना पठाण, खजिनदार-सारीकाताई शेळके,ग्रामपंचायत सदस्या रंभाताई फंड आदि मान्यवर महिला उपस्थित  होत्या.तसेच क्लासिक कंपनीचे को-ऑर्डीनेटर प्रविण सर उपस्थित  होते.शुभांगी मैड यांनी स्वागत केले तर  वाघताईंनी आभार मानले. आगामी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आज महिलांनी एकमेकींना येणा-या मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *