श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकरला मोजक्या पुरोहितांच्या उपस्थितीत पूजाविधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदचा अनेकांना फटका -कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावे – भाविकांची शिवशंकराकडे प्रार्थना 

382

घोडेगाव,ता.आंबेगाव :  (प्रतिनिधी,सीताराम काळे) –  हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकरला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने भीमाशंकर मंदिर भक्तांविना ओस पडले आहे. येथे दुस-या श्रावणी सोमवारी मोजक्या पुरोहितांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला.
बारा ज्योतिर्लींगांपैकी पुणे जिल्हयातील एकमेव असणारे भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने मंदिर परीसरात असणा-या लहान – मोठ्या सुमारे १७५ व्यावसायिकांचा व्यापार बंद पडला आहे. एसटी महामंडळाच्या  गाडया बंद आहे. त्यामुळे महामंडळाला देखील कोटयावधींचा फटका सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात भोलेंचा जय जयकार घुमणार नाही, ना भक्तांची गर्दी बघायला मिळणार. देशासह जगावर आलेले हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाऊ दे, अशी प्रार्थना भक्तांकडून मनोमन शिवशंकराला करण्यात येत आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शनासाठी मंदीर बंद असतानाही भाविक दाखल होऊ नये. यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हे विशेष खबरदारी घेत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *