मुरबाड,ठाणे : भिंवडी लोकसभा मतदार संघात मतदारांची कोडी,स्वस्वार्था साठी लोकसभा लढविणाऱयांना मतदार धडा शिकविण्याचीच शक्यता,तर अनेक जण बंडखोरीच्या तयारीत

668

       मुरबाड,ठाणे :  भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजप -शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना जरीउमेदवारी दिली असली तरी युतीतील घटक पक्ष शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश  म्हात्रे (बाळ्या मामा)  हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. तर कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या विरोधात कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सांवत हे दलित व मुस्लिम समाजाच्या सपंर्कात असुन आपली बाजु भक्कम करत नवे आव्हान तयार करत आहेत. मात्र या सर्व प्रकारात काही स्वस्वार्थासाठी बंडखोरी करुन तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा खेळ मांडत असल्याने कार्यकर्त्यासह मतदारांची कोंडी होत आहे. त्यामुळे मतदार यावेळी अशा सर्व उमेदवारांना योग्य तो धडा शिकवतील अशा प्रतिक्रिया सध्यातरी मतदारांतुन ऐकावयास येत आहेत.

मुरबाड मधिल स्थानिक सुरेश जाधव हे पण अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत. मागिल निवडणुकीत त्यानी बऱ्यापैकी मते घेतली होती. बंडखोरी करणारे तसेच अपक्ष व पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणुकीत दिलेले अश्वासनाला विसरतात. अनेकदा पैशाच्या जोरावर मतदार काबिज केला जातो.  त्यामुळे पैशावाले उमेदवार निवडुन येण्याचा दावा करतात.  मात्र यावेळी आम्ही मतदार याचा विचार करुन मतदाराची दिशाभुल करणाऱ्याना धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही, मतदार राजा जागा हो असा प्रचारच आम्ही करणार असल्याचे काही मतदारानी सांगितले. मत कुणालाही द्या मत मत विकत घेणाऱ्याना त्यांची जागा दाखवा अशा प्रतिक्रिया तरुण मतदार वर्गातुन येत आहेत. त्यामुळे येणारी निवडणुक उमेदवारांसह  मतदारांचीही कोंडी करणारी ठरणार असल्याने मतदार या वेळी कोंडी कसी सोडवतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *