जंबो केअर सेंटरमधील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे

282

पुणे (-प्रतिनिधी,सचिन दांगडे) : जंबो कोविड केअर सेंटरमधील उपकरणे, अनुभवी कर्मचारी आणि औषधे याबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले. जंबो कोविड केअर सेंटरमधील पायाभूत सुविधा आणि रुग्ण सेवेच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी सीईओपी येथील जंबो कोविड सेंटरला भेट दिली. त्या भेटीत त्यानी तेथील प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. खाजगी रुग्णालयांच्या वैद्यकीय संचालकांना केअर सेंटरच्या सल्लागार मंडळावर घ्यावे अशी सूचनाही यावेळी शिरोळे यांनी आगरवाल यांना केली.रुग्णालयातील व्हिजिटर सेंटर आणि माहिती व्यवस्थापन प्रणाली या विभागांनाही आमदार शिरोळे यांनी भेट दिली आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. केअर सेंटरमधील कारभारात समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाईकांनी शिरोळे यांच्याकडे व्यक्त केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *