रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, श्रीमती कांताताई नाईक, आदिम संस्था व किसान सभा यांच्या वतीने विविध विभागात मास्क वितरीत करण्यात आले.

आंबेगाव तालुक्यातील ५०० कोरोना योध्यांना मास्कचे वाटप 

394
घोडेगाव,ता.आंबेगाव : (प्रतिनिधी,सीताराम काळे) – आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्ष्वभुमिवर काम करत असलेल्या विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुमारे ५०० कर्मचा-यांना रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, श्रीमती कांताताई नाईक, आदिम संस्था व किसान सभा यांच्या सहकार्याने मास्क वितरीत करण्यात आले असल्याची माहिती डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर विभागातील पदाधिकारी व कर्मचारी आहोरात्र आपली सेवा बजावत आहेत. ही बाब नक्कीच अभिनंदनीय अशीच आहे. याच अनुषंगाने घोडेगाव येथील पोलीस बांधव, विज मंडळातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील अधिकारी व कर्मचा-यांना हे मास्क वितरीत करण्यात आले.
या उपक्रमाचे संयोजन डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, अनिल गाडेकर, समीर गारे यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *