कवठे येमाईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव – एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह – डॉ.राजेश कट्टीमणी 

1303
             शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून एक जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यास उपचारासाठी शिरूरला दाखल करण्यात आले आहे.  तर त्या रुग्नाच्या नजीकच्या संपर्कात आलेले ११ व लोरीस्क संपर्कांतील १३ अशा एकूण २४ जणांना क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.
       लोकसंख्येच्या दृष्टीने शिरूरच्या पश्चिम भागात मोठे गाव असलेल्या कवठे येमाईत आत्तापर्यंत ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप आले असताना आता गावठाणात नव्याने पुन्हा एकदा एकाला लागण झाली असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तर या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना स्वाब टेस्ट साठी मलठण कोविड सेंटरला पाठविण्यात आले असून लोरिस्क संपर्कांतील १३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात येत असल्याची माहिती डॉ.कट्टीमनी यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, सॅनेटाईझरचा वापर करावा,हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून नाक व तोंडावर मास्क,रुमाल यांचा वापर करावा असे आवाहन डॉ.कट्टीमनी यांनी  केले आहे. सर्दी,खोकला,तापाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन ही डॉ.कट्टीमनी यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *