शिक्रापूरच्या उपसरपंच पदी जयश्री जनार्दन दोरगे ; मुखई ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

464

शिक्रापूर,ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी जयश्री जनार्दन दोरगे यांची निवड झाल्यामुळे मुखई ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुखई गावची पलांडे कुटुंबियांची कन्या जयश्री ताई दोरगे निवडून आल्या ही आमच्या साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी मुखईचे मा.सरपंच सुरेश बापू पलांडे, नरसिंगराव पलांडे, युवराज पलांडे शरद पलांडे, अविनाश देशमुख गजरे, बाळासाहेब खुशालराव पलांडे, श्रद्धा पलांडे, शिक्रापूरचे सरपंच हेमलता राऊत, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, पुणे जिल्हा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, माजी सरपंच जयश्री भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, ग्रा.स. रोहिणी गिलबिले, मा.सरपंच भगवान वाबळे, मा.उपसरपंच दत्ताञय गिलबिले आदी मान्यवर उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *