शिक्रापूर,पुणे : अधिकाधिक महिलांनी संघटित होत व्यवसायाच्या वाट शोधत कार्यरत राहिल्यास प्रगतीचे शिखर गाठता येते – सरपंच पुष्पा जगताप, जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपञाचे वाटप

991
             शिक्रापूर,पुणे : अधिकाधिक महिलांनी संघटित होत व्यवसायाच्या वाटा शोधत कार्यरत राहिल्यास प्रगतीचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन पिंपळे जगतापच्या सरपंच पुष्पा जगताप यांनी केले.  पुणे येथील जनशिक्षण संस्थान, रोटरी क्लब  यांच्या सयुक्त विद्यमाने गाम्रपंचायतीच्या १४ व्या वित्आयोगाच्या माध्यमातुन पिंपळे जगताप  (ता.शिरुर ) येथे  फँशन डिझाईन कोर्सच्या प्रमाण पञाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ दिपाली ताई शेळके होत्या .यावेळी ४० महिलाना प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन दिपालीताई जगताप यांनी केले.प्रस्ताविक जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष अशोक लगड यांनी केले. यावेळी सरपंच पुष्पा जगताप,ग्रामसेवक छाया साकोरे उपसरपंच लक्ष्मण भुजबळ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब जगताप,सदस्य मनिषा जगताप ,विजय जगताप व परिसरातील महिला व ग्रामस्थ बहुसंख्य ने उपस्थित होते प्रशिक्षक,रेखा कळमकर ,अन्य उपस्थित होते.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *