रिव्हाँलव्हर ची विक्री करणारे तीन गुन्हेगार अटकेत ; अलिबाग पोलिसांची कामगिरी 

411
अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : रिव्हाँलव्हर ची विक्री करणाऱ्या सराहित गुन्हेगारांना अलिबाग पोलिसांनी रांगे हाथ पकडण्याची कामगिरी केली आहे. हे तीघेही अट्टल गुन्हेगार असून, याच्या विरुद्ध पोयानाड, रेवदंडा , मुरुड ठाण्यात चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.यातील एक गुन्हेगार हाती लागल्यानंतर त्याला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्याबरोबर त्याच्या जोडीला आणखीन दोन साथीदार असून त्यांच्या साथीने त्यांनी हे गुन्हे केल्याचे सांगितले. अलिबाग येथील पिंपळभाट या ठिकाणी मुजाहि्दी हुसेन मोमीन हा 39 वर्षीय माणूस रिव्हाँलव्हर आणि जिवंत काडतुस विक्री करायला येणार असल्याचे अलिबाग पोलिसांना समजले. त्या प्रमाणे सापळा रचला गेला आणि पेझारी येथे राहणारा मोमीन आपल्या जवळील रिव्हाँलव्हर आणि जिवंत काडतुसांना विक्री करण्यासाठी पिंपळ भाट जवळील रस्त्यावर येताचक्षणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेण्यात आली तेव्हा झडतीमध्ये त्याच्याकडुन  रिव्हाँलव्हर  आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. मोमीन ला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले  आणि त्याच्यावर भा.द.वि शास्त्र अधिनियम सन १९५९  चे कलम ३(१) ७२५ अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर याचे साथीदार पेझारी ढोलपाडा येथील गौरव गणपत पाटील आणि लेवी कामार्ले येथील विनेश प्रभाकर पाटील यांना देखील अटक करण्यात आले. ही कामगिरी पोलिस उप निरीक्षक अनिल सानप, पोलिस नाईक अक्षय जाधव, पोलिस शिपाई सुनील फड याच्यां पथकाने पार पाडली आणि पुढील तपास सपोनी के. टी. गावडे हे करत आहेत .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *