अमरण उपोषणास बसणा-या उपोषनकर्त्यांना गटविकास अधिकारी यांचे लेखी पत्र

430
घोडेगाव,ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : बेघरवस्ती क्रमांक दोन या घोडेगाव (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाश्यांना दैनंदिन वापरासाठी रस्ता मिळावा यासाठी दि. ७ रोजी अमरण उपोषणास बसले होते. त्यांना उपोषनाच्या पाचव्या दिवशी ग्रामपंचायत घोडेगाव यांनी रस्त्याबाबत योग्य तो सकारात्मक मार्ग ग्रामपंचायत दोन महिन्याच्या आत काढत असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषनकर्त्यांनी आपले उपोषन सोडले.
घोडेगाव बेघरवस्ती क्रमांक दोन येथील रहिवाश्यांना दैनंदिन वापरासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी सुमारे दीड वर्षांपुर्वी आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी तीन दिवस उपोषनानंतर सहा महिन्यांत रस्ता उपलब्ध करून देऊ, असे लेखी पत्र दिले होते. परंतु वीस महिने पुर्ण होऊनही रस्त्याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने येथील रहिवासी दि. ७ (शुक्रवार) रोजी पुन्हा दैनंदिन वापरासाठी रस्ता मिळावा यासाठी पंचायत समिती आंबेगावच्या कार्यालयाबाहेर स्वप्निल कोरडे, राहुल जाधव व सोमनाथ कोरडे उपोषणास बसले. गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी उपोषनकर्त्यांनी उपोशन सोडावे यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन पत्र दिले. त्यानंतर दि. ११ रोजी ग्रामपंचायत घोडेगाव यांनी रस्त्याबाबत योग्य तो मार्ग दोन महिन्याच्या आत काढत असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषनकर्त्यांनी उपोषन सोडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, सहायक गटविकास अधिकारी जे. के. लहामटे, ग्रामविस्तार अधिकारी जनार्दन नाईकडे, घोडेगाव सरपंच, सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *