निमगाव दुडेच्या उपसरपंचपदी कौशल्या पानगे यांची बिनविरोध निवड 

367
             शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमगाव दुडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज शनिवारी कौशल्या गजानन पानगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निमगाव दुडे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अश्विनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
    गावाच्या सर्वागींण विकासा साठी सर्वांना सोबत घेत कार्य करणार असल्याचे उपसरपंच पानगे यांनी सांगितले.यावेळी पुण्याचे सेवानिवृत्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सदस्या अरुणाताई घोडे,राहुल घोडे, स्थानिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे इतिवृत्त ग्रामसेविका शिला साबळे यांनी तयार केले. यावेळी उपसरपंचपदी नव्याने नियुक्ती झालेल्या कौशल्या पानगे यांचा मान्यवरांनी सत्कार करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *