भागडी येथे कृषी कन्येकडून शेतकऱ्यांना शेतीविषयक अनोखे मार्गदर्शन 

717

    शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आंबेगाव तालुक्यातील भागडी येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव  कार्यक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थिनी कु नयना दिनकर आदक हिने भागडी गावातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी उपयुक्त ठरणारे फायदे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अनेक प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यामध्ये नयना यांनी जीवामृत कसे बनवावे, मातीची नमुना चाचणी कशी घ्यावी,बियाण्यांवर प्रक्रिया कशी करावी ,फुलकोबी मध्ये ब्लांचीग कसे करावे अशी अनेक प्रात्यक्षिके सविस्तर माहितीसह सादर केली.

अशाच प्रकारे तिने इंदोर पद्धतीने कंपोस्ट खड्डा कसा तयार करून त्यात ओला व सुका पालापाचोळा,शेण – पाणी मिश्रण,आणि माती यांचे थर करून तो खड्डा कसा भरून घ्यावा याचे अत्यंत उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले आणि त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंका समाधान केले. तयार केलेले कंपोस्ट खत आपण शेतात कधी वापरू शकतो याची देखील सविस्तर माहिती सांगितली. गावातील उपस्थत शेतकरी बांधवांनी या कृषीकन्येचे कौतुक केले.
यावेळी बाळू दोरे ,श्याम आदक,गणेश केदारी ,दिनकर आदक,राम गवारी व महिला शेतकरी आवर्जून उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *