कवठे येमाईत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीम लवकरच सुरु करू – पोपटराव गावडे 

484
            शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे एटीम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणारा असल्याचे तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक पोपटराव गावडे व संचालिका डॉ.वर्षाताई शिवले यांनी अश्वासन दिले आहे.
              कवठे येमाई येथे कॅनरा बँकेचे एटीएम आहे.पण ते वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी मोठीच गैरसोय होत असल्याबाबत माजी उपसरपंच वैभवी उघडे,सामाजिक कार्यकर्ते विलास रोहिले,माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव उघडे व ग्रामस्थांनी याबाबत आमचे स्थानिक प्रतिनिधींकडे एटीम बाबतच्या नागरिकांना होत असलेल्या अडचणी व कैफियत मांडल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ञ संचालक,माजी आमदार पोपटराव गावडे व बँकेच्या संचालिका डॉ.वर्षाताई शिवले यांच्याशी संपर्क साधत कवठे येमाई येथे एटीम सुरु करण्याबाबत विचारले असता संचालक मंडाळाशी चर्चा करून लवकरच कवठे येमाई येथे जिल्हा बँकेचे एटीम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
          ” कवठे येमाई येथे गावात एकच एटीम असल्याने व तेथेही ते सुरू असण्यात सातत्यता नसल्याने एटीम धारक ग्राहकांना अनंत अडचणींना तोड द्यावे लागत आहे. अनेक वयस्कर शेतकरी,महिला, एटीएम धारकांना पहिल्या मजल्यावर असलेल्या एटीम पर्यंत जाणे ही अवघड होत आहे. गावात बस स्टॅंड नजीक असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बाजूलाच एटीम झाल्यास नागरिकांना बँकेत गर्दी न करता एटीएम मधून पैसे काढण्यास मोठाच दिलासा मिळेल. “
– वैभवी उघडे – माजी उपसरपंच,कवठे येमाई  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *