“बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी ” यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदन 

917

नवी दिल्ली (समाजशील वृत्तसेवा) : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना दिले. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु आहे. महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकिन व मालक यांच्या भावना,देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा, यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *