सर्व नागरिकांनी घरीच राहून आरोग्य पथकास सहकार्य करावे -कैलासबुवा काळे

363

घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : आंबेगाव तालुक्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” योजनेअंतर्गत मंगळवार (दि. ६) रोजी ३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी घरीच राहून आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन माजी पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांनी केले. आंबेगाव तालुक्यात मंगळवार (दि. ६) रोजी घोडेगाव, तळेघर, साकोरी, पिंपरी, पोखरी, राजेवाडी, पाटण, चिखली, काळेवाडी-दरेकरवाडी, कोलदरा- गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोळवाडी- कोटमदरा, फदालेवाडी-उगलेवाडी, चपटेवाडी, वचपे, अडिवरे, पंचाळे खुर्द व बु., माळीण, आमडे, आसाणे, एकलहरे, सुलतानपुर, ठाकरवाडी, थोरांदळे, वायाळमळा, शिंदेमळा, भोरवाडी, लाखणगाव, पोंदेवाडी, काठापुर बु., देवगाव, टाव्हरेवाडी, भराडी, मोरडेवाडी, शेवाळवाडी-लांडेवाडी या गावांतील नागरिकांची आरोग्य तपासणी होणार असुन अॅंटीजन तपासणी ग्रामीण रूग्णालय घोडेगाव, खाजगी लॅब, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर, अडीवरे, महाळुंगे पडवळ, पेठ, धामणी, निरगुडसर, लांडेवाडी येथे होणार आहे. यासाठी झोनल ऑफिसर, तांत्रिक अधिकारी, सर्वेक्षणातील टीम, टिममधील सहभागी कर्मचारी, रॅपिड अॅंटीजन तपासणी ठेवण्यात आली आहे, तसेच स्वयंसेवक व खाजगी लॅब यांचीही मदत घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घोडेगावात आतापर्यंत एक वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली असून मंगळवार (दि. ६) रोजी दुस-यांदा आरोग्य तपासणी केली जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *