पिंपरी पेंढार येथील सद्ससाधक सहकारी पाणीपुरवठा संस्था 27 वर्षानंतर कर्जमुक्त 

365

पिंपरी पेंढार,ता.जुन्नर (-प्रतिनिधी, अशोक डेरे) : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सद्ससाधक सहकारी पाणीपुरवठा संस्था 27 वर्षानंतर कर्जमुक्त झाली असून, या संस्थेने 1993 साली दिर्घ मुदतीचे जलसिंचन योजनेचे कर्ज घेऊन 393 सभासदांना 700 एकरला पाणी पुनवठा योजना राबविली. तर अपुरा वीज पुरवठा, सततचा दुष्काळ अशा अनेक कारणांमुळे ही संस्था अडचणीत आली, परंतु योजना सुरू राहिली बँकेचे व्याज वाढत गेले. शेतकरी अडचणीत आले, तरीही गेली पाच वर्षे बँकेकडे पाठपुरावा करून ओ.टी.एस योजनेमध्ये सर्व शेतकरी बांधवांना समाविष्ट करून दोन कोटी बासष्ट लाख सत्तावीस हजार चारशे बेचाळीस रुपये भरणा करून संसंस्थेतील सर्व शेतकरी बांधव कर्जमुक्त झाले. सत्तावीस वर्षांनंतर कर्जमुक्ती झालेल्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि संस्थेचे चेअरमन रोहिदास वेठेकर, सर्व संचालक मंडळ, कृती समिती यांनी पेढे वाटुन फटाके वाजून आनंद व्यक्त केला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *