मुरबाड आगारातून ग्रामीण बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांमधून मागणी

414

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्य भर महाराष्ट्र राज्य परिवहन ने लांब पल्ल्याची प्रवाशी वाहतूक सुरू केली असताना, मुरबाड आगारातुन मुरबाड- कल्याण- मंत्रालय, टोकावडे-कल्याण, मुरबाड -बदलापूर-मंत्रालय अशी बससेवा फक्त सूरु असल्याने, तालुक्यातील ग्रामीण जनतेचे हाल सुरू आहे. गणपती काळात मुरबाड आगारातील ग्रामीण सेवा 10 दिवस सुरू होती. मात्र उत्पन्न नाही अशी ओरड करत पुन्हा ही सेवा बंद करण्यात आली. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक कामगार मुरबाड औद्योगिक क्षेत्रात कामाला येतात, तर अनेक कामगार कल्याण, ठाणे मुंबई येथे जातात पण बससेवा सुरू नसल्याने स्वतःची मोटरसायकल घेऊन जावे लागते. यात आर्थिक, मानसिक व शारीरिक हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळे मुरबाड आगारातून ग्रामीण सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. याबाबत आगारप्रमुख अमर पंडित याना विचारले असता उत्पन्न कमी येत असल्याने बस सेवा बंद आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच बससेवा सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *