तर…. मुरबाड मध्ये भाजपला मोठे आव्हान तयार होईल ; नगरपंचायत निवडून

1223

मुरबाडमध्ये राजकीय पक्षांची रणनीती आखण्यास सुरुवात  

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल संपत येत असल्याने सर्वच राजकिय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण तालुक्यातील भाजपला शह देणे म्हणजे आमदार किसन कथोरे याना टक्कर देणे असे समीकरण असल्याने, सध्या शिवसेने व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पक्ष ही टक्कर देऊ शकत नाही, असे जरी वाटत असले तरी सर्वपक्ष विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगेल अशी राजकीय चर्चा मुरबाड मध्ये सुरू आहे. शिवसेनेचे मागील निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आले होते तर अपक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 1 असे उमेदवार निवडून आले होते. तर भाजपकडे 17 उमेदवार नसताना शिवसेनेच्या एका गटाला घेऊन भाजपने पक्षाचे 17 उमेदवार उभे केले व 11 उमेदवार निवडून आणले. मात्र यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात कुठलेही विकास काम करण्याची संधी तसेच कामासाठी निधी देखील मिळत नव्हता, या बाबत त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सांगितले. पण याकडे कानाडोळा झाल्याने शेवटी पक्ष त्याग करून  त्यांना भाजप मध्ये प्रवेश करावा लागला. तर दुसरीकडे एकमेव अपक्ष उमेदवार, ही भाजपात जाऊन आज पाचव्या ते नगराध्यक्षापदी विराजमान आहे. तर राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेविका ही भाजपमय झाल्या. काँग्रेस नगरसेवक आजही काँग्रेसचा असला तरी 16 विरुद्ध 1 मत काय करणार ? अशी परिस्थिती होती. पण आता मुरबाड नगरपंचायतच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक नगरसेवकांचा स्वतःचा विकास पाहिल्याने आज प्रत्येक पक्षातून नगरसेवक होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पण आमदार किसन कथोरे यांनी व खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मुरबाड भाजपने निवडणूक पूर्व तयारी करताना जम्बो शहर कार्यकारणी करून पुन्हा सत्ता काबीज करण्याचे ठरविले आहे. मुरबाड मधील अनधिकृत गाळे बांधकाम, अतिक्रमण, नळपाणी जोडणी मधील सावळागोंधळ, सर्वांसाठी घर, विकासकामातील भ्रष्टाचार, दिव्यांग निधी अश्या प्रकारचे बरेच मुद्दे विरोधी पक्षाने उचलून धरले. जर भाजपला रोखायचे असेल तर मुरबाडमध्ये सर्व पक्ष विरुद्ध भाजप असाच निवडणूक लढा रंगणार असे चित्र आहे. मात्र भाजप व शिवसेना यांची स्थानिक पातळीवर युती होणार असल्याचे ही कुजबुज सुरू असल्याने कट्टर शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या काही निर्णयामुळे मागील निवडणूकित शिवसेनेला सत्तेपासून दूर जावे लागले. पण आत्ता ही भाजप शिवसेना यांनी एकत्र लढल्यास कार्यकर्ते या मध्येच भरडले जाणार आहे. जर भाजप विरुद्ध सर्वपक्ष अस समीकरण झाल्यास मुरबाड मध्ये भाजपला मोठे आव्हान तयार होईल हे निश्चित !

 

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *