“माझा परिवार माझी जबाबदारी” या अनुषंगाने पिंपरी पेंढार येथे गुढी मोहस्तवाचे आयोजन 

328

पिंपरी पेंढार,ता.जुन्नर (-प्रतिनिधी, अशोक डेरे) : पुणे जिल्हा परिषद आयोजित कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत माझा परिवार माझी जबाबदारी या अनुषंगाने ग्रामपंचायत पिंपरी पेंढार येथे सर्व अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांनी गुढी उभारण्याचे आयोजन करून सुरक्षिततेचा संदेश दिला. पुणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.  तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गत वाढ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना “माझा परिवार माझी जबाबदारी”च्या अनुषंगाने बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पर्यवेक्षिका सुरेखा हांडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पिंपरी पेंढार येथे गुढी मोहस्तवाचे अयोजन केले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या रंजनताई काळे, सविता वाघ, रोहिदास वेठेकर, किसन कुटे, डॉ पुरुषोत्तम बोऱ्हाडे, पोलिस पाटील संकेत जोरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *