आलेगांव परिसरातील पाळीव प्राण्यांवर “लम्पि” आजाराचा प्रादुर्भाव

423
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : गेल्या मार्च महिन्या पासून कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाने मानव चिंतेत असतांना पाळीव जनावरांना लम्पि आजाराने ग्रासले असतांना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगांव पशु चिकित्सालया मध्ये गेल्या दीड महिन्या पासून कायम स्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे, वरीष्ठ अधिकार्याच्या आदेशानुसार पशुधन सेवक एच.डब्ल्यू. मात्रे आजारी पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. तसेच तालुका पशु वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोन दिवस सेवा देत आहेत. तरी राज्य शासनाने वेळीच खबरदारी घेऊन आलेगांव येथे कायम स्वरूपी पशु वैद्यकीय अधिकाऱ्या ची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून आलेगांवला ओळखले जात असून, आलेगावामध्ये पशु चिकित्सालय असून, सदर दवाखान्याअंतर्गत १८ गावे जोडलेली आहेत. येथे पाळीव जनावरांवर उपचार करण्याकरीता कायम स्वरूपी पशु अधिकाऱ्यांची आवश्यकता असतांना, गेल्या दीड महिन्यापासून पट्टी बंधक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार पशुधन सेवक एच.डब्ल्यु. मात्रे पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. तसेच पातूर तालुका पशु वैद्यकीय अधिकारी सुद्धा आठवड्यातून दोन दिवस आलेगांव पशुचिकित्सालयामध्ये सेवा देत आहेत. सद्या लम्पि आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्राप्त माहिती नुसार लम्पि आजाराने ग्रासित जनावरांवर उपचार करण्यासाठी आलेगांव पशु चिकित्सा लया दि.२९/९ रोजी १,००० लस उपलब्ध झाली होती. सदर लस आलेगांव अंतर्गत गावातील लम्पि आजार ग्रस्त जनावरांना देण्यात आले. दि ६/१० रोज पासून सदर लस संपलेली आहे.त्यामुळे लम्पि सदृश आजारावर प्राथमिक उपचार म्हणून लॉगझिवेट, हायटेक, मेघलूमाईन आणि इंजेक्शन डेक्झोना व टॅबलेट हायटेक बोलस असा उपचार करीत असल्याचे समजले लम्पि आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लम्पि लस सह आलेगांव पशु चिकित्सा लयामध्ये कायम स्वरूपी डॉक्टर ची मागणी पाळीव जनावरे पालकां कडून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *