महिला सुरक्षेसाठी त्वरित कडक कायदा करावा -भाजपा महिला आघाडी  

518
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याने महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्वरित कडक कायदा करावा यासाठी मुरबाड मध्ये भाजपा महिला आघाडीने मुरबाडच्या तीनहातनाका ते तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढून सरकारकडे कडक कायदा करण्याची मागणी केली.  महाविकासआघाडीच्या सरकारच्या काळात महिला असुरक्षित असून बलात्कार, अत्याचार, विनयभंग हत्याकांड, असे प्रकार घडत आहेत. तर पनवेल येथील कोव्हीड सेन्टर मध्ये  उपचारासाठी आलेल्या महिले बाबत घडलेल्या प्रकारचा निषेध करत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही निवेदन दिले पण त्यांनी याबाबत गांभीर्य न दाखविल्याने आज पुन्हा राज्यात भाजप महिला आघाडीने प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी त्वरित कडक कायदा करावा अशी मागणी केली आहे. यावेळी तहसीलदार अमोल कदम यांनी तहसीलदार कार्यालयाबाहेर शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. यावेळी समाजशील शी बोलताना ठाणे जिल्हा महिला मोर्चा च्या अध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनी उत्तरप्रदेश मधील हाथसर येथील घटने बाबत ही दुःख व्यक्त करत, पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. अशीही मागणी केली. तर सरकार कुठलंही असो पण महिलांवर होणारे अत्याचार रोखले गेले पाहिजे, यासाठी महिला सुरक्षेसाठी कडक कायदे त्वरित केले पाहिजे अशी मागणी केली असल्याचे सांगितले.
यावेळी महिला मोर्चाचे नेतृत्व प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरेयांनी केले. ठाणे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा शीतल तोंडलीकर, अंबरनाथ महिला मोर्चा अध्यक्ष मिनल मोरे ,आमदार किसन कथोरे, नवनिर्वाचित मुरबाड तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्वरा चौधरी, महिला मोर्च्या शहराध्यक्षव नगराध्यक्षा छाया चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, नितीन मोहपे, श्रीकांत धुमाळ, उल्हास बांगर, सुधीर तेलवणे, चेतन घुडे यांच्या सह नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *