चक्रीवादळामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान ; विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत युवक वर्ग 

303
 घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : न्हावेड (ता.आंबेगाव) येथे गावातील युवकांनी विद्यार्थ्यांना गावातील एका व्यक्तीच्या घरात शाळा अभ्यास वर्ग सुरू केला “आमची शाळा बंद, पण शिक्षण चालू” या उपक्रमांतर्गत येथील तरुणांनी नियोजन करत मोफत शिक्षण देत आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत. सरकारमार्फत ऑनलाईन शिक्षण कार्याची घोषणा होऊन कार्यप्रणाली सुरू झाली. मात्र या या प्रणालीचा फायदा व अंमलबजावणी ग्रामीण भागात प्राकृतिक व अनेक सुविधांच्या अभावामुळे फारशी प्रभावीपणे राबवली जाऊ शकत नाही. मुलांमधील अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये सातत्य राहून, अभ्यासाची सवय सक्रिय व निरंतर जोपासली जावी या उद्देशाने न्हावेड गावातील सुशिक्षित, उच्चशिक्षित युवक युवतींनी व गावातील ग्रामस्थ पालक आणि गावातील पण नोकरीनिमित्त शहरी भागामध्ये असणारा नोकरदार वर्ग यांच्या सहकार्यातून, “आमची शाळा बंद, पण शिक्षण चालू ” हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
या भागात ३ जूनच्या चक्रीवादळामुळे गावातील शाळा व सार्वजनिक समाज मंदिर या इमारतींचे पत्रे उडून गेले आणि बांधकाम पण काही अंशी खचले आहे. जून व जुलै महिन्यात पावसाचे जास्त प्रमाण, विजेचा नेहमीच अनियमित पुरवठा आदी अनेक समस्या युवकांच्या समोर होत्या मात्र गावातील तरुणांनी योग्य नियोजन केले सुरुवातीस त्या गावातील एका व्यक्तीच्या घरात शाळा-अभ्यास वर्ग सुरू केला. ९ ऑगस्ट पासून गावातील २० ते २२ वर्षापूर्वीच्या अतिशय जीर्ण सार्वजनिक समाज मंदिर इमारतीमध्ये अभ्यास वर्गाचे कार्य चालू आहे. शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मूलभूत अध्यापन केले जात आहे. इयत्ता, वेळ, विषय अध्यापक करणारे घटक यांचे नियोजन करून वेळापत्रक तयार करून अध्यापन केले जात आहे. रविवारी स्पर्धा परीक्षा उपयुक्त सामान्य ज्ञान व ज्ञान या विषयावर चर्चासत्र घेतली जातात. काही आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *