मुरबाड,ठाणे : मुरबाड महावितरण मधील मिटर तुटवडा संपणार कधी ? मिटर मिळत नसल्याने नागरिकात संताप

544
              मुरबाड,ठाणे : मुरबाड महावितरण कार्यालयात पैसे भरुनही मिटर मिळत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत असुन मिटर उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद होताना दिसत आहेत .
              मुरबाड वीज कार्यालयात मिटरच मिळत नसल्याने दुर्गम भागातुन येणारे ग्राहक परततांना संताप व्यक्त करताना दिसत आहेत. याबाबत विज मंडळाच्या अधिकारी सोनावणे  यांच्याशी संपर्क साधला असता.पाच लाख मिटर वरिष्ठ बांद्रा कार्यालयाकडुन खरेदी झाल्याचे कळाले आहे मात्र ग्रामीण भागात एक ही मिटर उपलब्ध न झाल्याचे सांगितले. मागिल काही महिन्यापुर्वी  विज मंडळाच्या बांद्रा कार्यालयाकडुन ग्रामिण  भागात कुठेही मिटरची कमतरता रहाणार नाही अशी बातमीही  विविध वृत्त पत्रात आली असताना मिटर का मिळत नाही  ? असा सवाल ग्राहकांकडुन होत आहे. नादुरुस्त मिटर बदलण्यासाठी तसेच  नविन मिटर साठी सहासहा महिने पैसे भरुनही मिटर मिळत नसल्याने ग्राहकांना अंधारात राहाण्याची वेळ आली आहे. तर विभागिय कार्यालयातील कारणे एकुन दुर्गम भागातील तसेच मुरबाड परिसरातील लोक थेट मुख्य कार्यालयात येवुन वाद घालतात.  मिटर लवकर न मिळाल्यास ग्राहक एकत्र येवुन आंदोलन छेडतील असा ईशारा ग्राहक वर्गातुन दिला जात आहे.
–  प्रतिनिधि,जयदीप अढाईगे(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *