अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान – पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी – जयवंतराव भाकरे

330

शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सध्या पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्याच्या विविध भागात पडत असलेल्या  अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे यांनी सरकारकडे केली आहे.या संदर्भातील निवेदन भाकरे यांनी शिरूर तहसीलदारांकडे आज दिले.
चालु साल हे सुरवातीपासुनच शेतक-यांना कष्टाचे व तोट्याचे गेले आहे. ऐन रब्बी पिकांच्या काढणी नंतर शेतमाल विकुन चारपैसे पदरात पडायच्या कालखंडात कोरोना रोगाच्या साथीमुळे अवघ्या देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. विक्री व्यवस्था पूर्ण कोलमडल्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले.वाहतुक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली, भारतीय शेती ही नेहमी दुस-यावर अवलंबून असल्याने पाठवलेला शेतमाल व्यापा-याने काय भाव विकला? हेच शेतक-याना निट समजले नाही व प्रंचड मोठा तोटा सहन करावा लागला. यावर्षी निसर्ग ही कोपला अवेळी व खुप मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी आधीच कर्जबाजारी त्यातुन हे नुकसान,कसा सावरणार तो?
शेतकरी या सर्व अडचणीतून कसातरी सावरत असताना ऑक्टोबर मध्ये परत पावसाने थैमान घातले. खरीपाचा हाती येणारा माल पुरा नाश पावला.  आणि त्यावर कहर की काय आलेले चक्रीवादळ मुग, उडीद, सोयाबिन, कापुस, कांदे, बटाटे, या सारखी दोन पैसे मिळवून देणारी पिके,डाळिंब,द्राक्ष यासारखी नगदी पिके देखील पावसामुळे पुर्ण नष्ट झाली.
अशा अवघड परीस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मदतीस धावून येणार नसेल तर जगाच्या या पोशिंद्याला वाली कोण? माणुनच बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शासन दरबारी निवेदन देत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन व तसे आदेश देऊन बाधित शेतकऱयांना किमान बियाने व इतर खर्चाच पैसे तरी मिळतील याची दक्षता शासनाने घ्यावी.व लवकरात लवकर नुसान भरपाई संबधित शेतक-यांना मिळावी जेणे करुण पुढील रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करु शकतील अशी आग्रही मागणी भाकरे यांनी शासनाकडे केली आहे.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *