कवठे येमाई सिंडिकेट (कॅनरा) बँकेला अधिकारी मिळतील काय ? ग्राहकांना होतोय दीड महिन्यांपासून मनस्ताप 

408
              शिरूर,पुणे – (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई कॅनरा बॅंकेत मागील दीड महिन्यांपासून ३ अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्याने व त्यांच्या जागेवर अद्याप ही अधिकारी नियुक्त न केल्याने  येथील बँकेच्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना व मनस्ताप ही सहन करावा लागत आहे. या शाखेला तात्काळ अधिकारी नियुक्त होतील काय ? असा सवाल ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत कॅनरा बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर रामभाऊ मिश्रा यांचेशी आज दि. १९ सकाळी ११ ला संपर्क साधल्यानंतर येत्या ७ दिवसांत कवठे शाखेत रिक्त असणाऱ्या जांगांवर तात्काळ अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
              सुमारे १६ हजार लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई येथील सिंडीकेट बँकेत परिसरातील वाड्यावस्त्यांसह गावातील अनेक नागरिक,शेतकरी,दूध उत्पादक व इतर व्यावसायिकांचे बँकेत दैनंदिन व्यवहार सुरु असतात. मागील एक महिन्यांपूर्वी या शाखेतील व्यवस्थापक,उपव्यव्यवस्थापक,शेतकी अधिकारी यांची इतरत्र बदली झाली असून अद्याप या शाखेत नवीन नियुक्ती झालेली नाही.परिणामी ग्राहकांचे बँकेशी निगडीत कर्जप्रकरणे,लेणदेन,नवीन खाते उघडणे,दाखले व इतर सेवा मिळण्यासाठी अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ४० वर्षे जुन्या असलेल्या या शाखेत अधिकारीच नसल्याने अनेक ग्राहक इतर बँकांकडे वळू लागले आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन येथे अधिकारी नियुक्त करण्याची मागणी बँकेचे ग्राहक व नागरिकांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *