कवठे येमाईच्या आदित्य खाडेचे एमबीबीएस नीट प्रवेश परिक्षेत दैदिप्यमान यश – ७२० पैकी ६५३ गुण

565

शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील आदित्य भाऊसाहेब खाडे या विद्यार्थ्याने भारत सरकारच्या एमबीबीएस नीट प्रवेश परिक्षेत 720 पैकी 653 गुण मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते.  आदित्य याचे दहावीपर्यंत शिक्षण चैतन्य विद्यालय ओतूर येथे तर अकरावी बारावी शिक्षण एसपी महाविद्यालय पुणे येथे झाले आहे.  नीट परीक्षेसाठी पुणे येथे क्लासेस लावून या परीक्षेत चांगले गुण मिळवणारा आदित्य एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा त्याने मानस व्यक्त केला आहे. मुलं कवठे येमाई येथील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला आदित्य खाडे हा लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा असून त्याने दहावीला ओतूर केंद्रात ९६.८० टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला होता.  त्याचे वडील भाऊसाहेब खाडे हे ओतूर येथील चैतन्य विद्यालय येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत ते उत्कृष्ट निवेदक आहेत तर आई पण विघ्नहर विद्यालय ओझर येथे अध्यापिका आहे.
आदित्यच्या या प्रशंसनीय यशाबद्दल जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, सदस्य मोहित ढमाले,ग्रा.वि मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,शहाजी पवार यांच्यासह जुन्नर व शिरूर तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *