सावित्रीबाईंचे कार्य अतुलनीय – सरपंच हेमलता शिंदे – वडगाव शिंदे-काकडे येथे सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

377
         कोरेगाव भीमा,शिरूर : (प्रतिनिधी,गजानन गव्हाणे) – थोर क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांच्या मुळे आज महिला विविध ठिकाणी आघाडीवर राहुन गावाचे, राज्याचे व देशाचे नेतृत्व करत असल्याचे मत वडगाव शिंदे – काकडे येथील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच हेमलता शिंदे यांनी व्यक्त केले.
          वडगाव शिंदे – काकडे, ता. हवेली येथील ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच अंजना गोसावी, माजी उपसरपंच युवराज काकडे, वैभव शिंदे, स्वप्निल शिंदे, साधना काकडे, रेखा लांडगे, किशोर गायकवाड, गरड मामा आदी यावेळी उपस्थित होते.
           महिलांच्या आयुष्यात शिक्षणरूपी प्रकाश टाकण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून झाले असून त्यांच्यामुळे आज महिला शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला आदी क्षेत्रात आघाडीवर असल्याचे हेमलता शिंदे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *