नव्या वर्षात मुरबाड तालुक्यातील 274 नागरिकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ : मुरबाड पंचायत समितीची भेट  

553
             मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – नव्या वर्षात मुरबाड तालुक्यातील 274 ओ बीसी नागरिकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळला असून या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्याने नागरिकांना नव्या वर्षाची मुरबाड पंचायत समितीची अनोखी भेट मिळाली आहे.
            मुरबाड पंचायत समितीच्या 2016/17 मध्ये प्रधान मंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत  274 लाभार्थ्यांची यादी प्रलंबित होती.  मात्र मुरबाडचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्या मुळे पंचायत समिती मुरबाड चा 2016 /17 ची  274 लाभार्थींची प्रलंबित यादीला मान्यता मिळाली व योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली.
             मुरबाड तालुक्यातील ओ बीसी, अनु जाती व अनु जमाती साठी असलेल्या प्रधान मंत्री आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना व शबरी आवास घरकुल योजना यांचा पंचायत समितीचा लक्षांक पहाता 2017/18 ते आतापर्यंत 16 हजार लाभार्थी लाभा पासून वंचीत असल्याचा अहवाल ग्रामपंचायत स्तरावरून  झालेल्या सर्वे नुसार समोर येत आहे.  त्या साठी प्राप्त  ‘ड’ प्रतीक्षा  यादीचा पुन्हा सर्वे होणार असून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सांगितले. नव्या सर्वे नुसार योजनेच्या निकषानुसार प्रधान मंत्री आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना , व शबरी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही धुमाळ यांनी सांगितले.  मात्र नव्या वर्षात 274  लाभार्थ्यांना मिळालेला लाभ ही अनोखी भेट असल्याचे लाभार्थी वर्गातून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *