सावधान ! कवठे येमाईत कोरोनाचे पुन्हा ४ ऍक्टिव्ह रुग्ण – सणासुदीच्या काळात कोरोनापासून दक्षता घ्या – डॉ.नामदेव पानगे यांचे आवाहन

991

शिरूर,पुणे : ( प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईत पुन्हा एकदा कोरोनाचे ४ रुग्ण ऍक्टिव्ह असून उपचार घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकान, इतर साहित्य खरेदी,करताना नागरिकांचा एकमेकांशी जवळून संपर्क येण्याची शक्यता असल्याने  कोरोनापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी अत्यंत दक्षता घेण्याचे आवाहन कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे.

कवठे येमाई हे लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे व व्यापारी पेठा असलेले गाव आहे. परिसरातील अनेक गावे व वाड्यावस्तीतील लोक येथे विविध साहित्य खरेदीसाठी येत असतात. लवकरच दिवाळी सण सुरु होत आहे. त्यानिमित्ताने खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. कोरोना संपला असे गृहीत धरून अनेक सुशिक्षित बेजबाबदार नागरीक शासनाचे कोरोना प्रतिबंधक नियम व सूचनांकडे सारासार दुर्लक्ष करीत विनामास्क फिरताना व गर्दीत दक्षता घेताना दिसून येत नाहीत.कोरोना पुन्हा फैलावू नये म्हणून सर्वच नागरिकांनी अत्यंत काळजी व खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून दुकानदार व व्यापाऱयांनी कोरोना संरक्षक सूचना व उपायांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.दक्षता घेण्यासंदर्भात नागरिक बेफिकीरच दिसून येत आहेत.नागरिकांनी विनाकारण गावात न फिरता अत्यावश्यक असेल तरच गावात यावे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब करावा. विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल’.

  – संतोष गायकवाड,ग्रामविकास अधिकारी,कवठे येमाई  




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *