बनावट आधारकार्ड बनविल्याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

364
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : जांभोरी (ता. आंबेगाव) येथील मधुकर हिले यांचा मुलगा असल्याचे भासविण्यासाठी बनावट आधारकार्ड बनविल्याप्रकरणी सत्यनारायण हरिलाल गुप्ता रा. मळीयान, जोधपुर उत्तरप्रदेश यांच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिली.
तर सखुबाई मधुकर हिले. (रा. जांभोरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील १५ वर्षांपूर्वी सत्यनारायण गुप्ता हा भिमाशंकर येथे आला असता. त्याची व माझा मुलगा सुभाष हिले यांची ओळख झाली. त्यावेळी त्याने मी एकटाच असुन मला कोणीही कुटुंबीय नाही, नातेवाईक नाही असे सांगुन सुभाषकडे घरात राहण्याबाबत परवानगी मागितली. आणि आंम्हाला त्याची दया आलेने त्यास घरात आसरा दिला. त्यानंतर ५ ते ७ वर्षानंतर दुसरीकडे जातो असे सांगुन खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडी येथे राईसमिल चालवू लागला. राईस मिल वर कामास असलेली गावातील व्यक्ति भिकाजी केंगले कडुन समजले की सत्यनारायण गुप्ता याचे आधारकार्ड आले असून, त्यावर त्याचा फोटो आहे. परंतु त्यावर त्याचे नाव सत्यनारायण मधुकर हिले रा. आंबोली, सुपे सातकरवाडी ता. खेड जि. पुणे असे आहे. याबाबत खात्री झालेने गुप्ता घरी राहण्यास असताना पती मधुकर हिले यांचे ओळखीचे, वास्तव्याचे कोणते तरी कागदपत्र किंवा त्याच्या प्रती मिळवून त्या कागदपत्रांचा गैरवापर करून तो मधुकर हिले यांचा मुलगा असलेले भासविणेसाठी बनावट कागदपत्रे बनवून त्याचा वापर करून तसेच त्या आधारे त्याच्या मुलांचे आडनाव हिले असे लावल्याने त्याच्याविरूध्द घोडेेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
घोडेगाव पोलीसांनी संबंधित तक्रारीची नोंद घेत आरोपीस तत्काळ अटक केली असुन न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील कोणत्याही नागरिकांची सत्यनारायण हरिलाल गुप्ता किंवा सत्यनारायण मधुकर हिले या नावाने फसवणुक केली असेल तर त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *