समाजशील चे प्रतिनिधी राजाराम गायकवाड यांचा कोव्हिड योध्दा पुरस्कार ने सन्मान  

425

शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : आखिल भारतीय माळी युवा मंच शिरुर तालुक्याच्या वतीने साप्ताहिक समाजशील चे प्रतिनिधी राजाराम गायकवाड यांचा कोव्हिड योध्दा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गायकवाड आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कोरोना काळात कोरोनाची जनजागृतीचे काम केले असून, आपल्या वृत्तपत्राद्वारे तसेच चॅनेल द्वारे अनेक समस्या प्रधान बातम्या देऊन समाज उपयोगी असे त्यांनी अनेक कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या या कार्याचा आदर्श उदाहरण असून त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे राष्ट्रीय किसान मजदुर संघाचे जिल्हाध्यक्ष विकास नरके यांनी सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन जकाते उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *