कुबेर समूहाच्या चौथ्या दिवाळी अंकाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन 

410

      शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) –  फेसबुकच्या आभासी दुनियेत सामाजिकतेची जाणीव ठेवत एकत्र आलेल्या मित्र समूहातून समवैचारिक मने जुळलेल्या कुबेर फाउंडेशन या वैचारिक संस्थेच्या कुबेर दिवाळी अंकाचे प्रकाशन काल दि. १८ ला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी मंत्री मुंडे साहेब यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी हेही उपस्थित होते.

फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा फेसबुकला कुबेर ग्रुप आहे. या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक,धार्मिक व लोकउपयोगी व विधायक कार्यक्रम कुबेर समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. कुबेर समूह मागील ४ वर्षांपासून वाचकांसाठी कुबेर दिवाळी अंक प्रकशित करीत आहे. यावर्षीही कुबेर अंकाचे संपादक संतोष लहामगे व सहकाऱ्यांनी दिवाळीत वैविध्यपूर्ण वैचारिक मेजवानी वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *